चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी- अशी करा नोंदणी.:- जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार.

Bhairav Diwase

उमेदवारांना सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती.

Bhairav Diwase. July 22, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- दि.20 जुलै 2020 जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दिनांक 23 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी नाव नोंदणी करून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. यासाठी उमेदवारांकरी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.



ही असणार ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती:

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधुन महास्वयम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वन या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा.आय अॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय बटनावर क्लिक करा.

23 जुलै रोजी मेळाव्याच्या दिवशी उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग इत्यादींच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी काही अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत 07172-252295 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.