Top News

आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह पावसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करत करून घेतले पंचनामे.

तात्काळ शासकीय मदत देण्याचे निर्देश.

नुकसान ग्रस्त कुटुंबियांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदत.
Bhairav Diwase. July 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- मागील तिन ते चार दिवसांपासून शहरात पावसाची संतत धार सुरू आहे. याचा फटका अनेक घरांना बसला असुन घरांची पडझड झाली आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना बोलावून पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून घेत तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सूचना केल्यात. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार गादेवार व तलाठी वर्भे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने