दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भाजपाचे जिल्ह्यात आंदोलन.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन.
Bhairav Diwase. July 21 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रु. अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन आज मंगळवार(२१जुलै)ला जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले.शासनाने या मागण्या मान्य न केल्यास १ ऑगस्ट ला आ सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा भाजपा ने दिला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष(ग्रामीण) देवराव भोंगळे, जिल्हा अध्यक्ष( महानगर) डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखी कांचरलावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक छाबुताई वैरागडे, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार आक्कापेल्लीवार यांची उपस्थिती होती

लॉकडाऊन मध्ये दुधाची मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबल्याने दुधाचे भाव १६, १७ रु. पर्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने २५ रु. लिटर प्रमाणे दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र ठराविक दूध संघांकडूनच शासनाची दूध खरेदी केली जात आहे. परिणामी राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. अशा स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रू. दर द्यावा अश्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने