Top News

"कुणी युरिया देता का युरिया."

चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांची युरिया खतासाठी पायपीट.
Bhairav Diwase. July 22, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- मागील एक महिण्यापासून चिमूर तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खतांचा तुटवडा आहे,ज्या कृषी केंद्र दुकानदाकडे युरिया आहे आपल्या जवडील शेतकऱ्यांना युरिया देत आहेत परंतू सर्वसामान्य शेतकऱ्यांची युरीया साठी वणवण फिरून पायपीट होतांना दिसत आहे.
शेतीचा हंगाम होऊन जवळपास दोन महिने होऊन गेली शेतात सोयाबीन तसेच कापूस लागवड झालेली आहे काही ठीकानी अल्पशा प्रमानात धान पिकाची रोवणी सुद्धा झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना खतांची आवश्यकता आहे परंतु चिमूर तालुक्यातील कृषी दुकानात युरिया खतांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना खतच मिडत नसल्याने पिकांना नेमके द्यावे काय हा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे ते युरिया नसताना पर्याय म्हणून महागडे खत विकत घेऊन पिकांना देत आहे पण गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा खर्च झेपत नसल्याने त्यांची खूपच अडचण निर्माण झाली आहे या कडे वारंवार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले जात आहे परंतु कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने