Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर, बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा तालुक्‍यात सार्वजनिक ठिकाणी 50 ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध होणार.

Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना महामारीच्‍या काळात मदतकार्यात अग्रेसर असलेले माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने आता त्‍यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर, बल्‍लारपूर, मुल आणि पोंभुर्णा तालुक्‍यातील 50 ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे वितरण करण्‍यात येणार आहे. विशेष म्‍हणजे या तालुक्‍यांमध्‍ये सार्वजनिक स्‍थळांवर या ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसविण्‍यात येणार आहेत.
सध्‍या कोरोना रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून काही रूग्‍ण मृत सुध्‍दा झाले आहे. अशावेळी खबरदारीचे उपाय म्‍हणून नागरिक जेव्‍हा शासकीय कार्यालये वा अन्‍य सार्वजनिक ठिकाणी जातात त्‍यावेळी स्‍वच्‍छता राखणे अत्‍यंत गरजेचे आहे. सॅनिटायझेशन हा त्‍यातील महत्‍वाचा भाग असल्‍यामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर, चंद्रपूर, मुल आणि पोंभुर्णा या तालुक्‍यांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्राम पंचायती, पोलिस स्‍टेशन, पंचायत समितीच्‍या इमारती आदी ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍याचे निश्‍चीत केले आहे. या ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनसह 1250 लीटर सॅनिटायझर लिक्‍वीड सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे. या सर्व ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन झीरो बी या नामांकित कंपनीच्‍या आहेत.
या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सीएसआर निधीतुन चंद्रपूर सिटी पोलिस स्‍टेशन, रामनगर पोलिस स्‍टेशन, वाहतुक नियंत्रण शाखा, दुर्गापूर पोलिस स्‍टेशन, बल्‍लारपूर पोलिस स्‍टेशन याठिकाणी प्रत्‍येकी एक ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. प्राथमिक आरोग्‍य केंद्र घुग्‍गुस, ग्राम पंचायत घुग्‍गुस या ठिकाणी सुध्‍दा ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. नागभीड तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र बाळापूर, कोरोना केअर सेंटर नागभीड याठिकाणी या मशीन्‍स उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण रूग्‍णालय बल्‍लारपूर, ग्रामीण रूग्‍णालय पोंभुर्णा, उपजिल्‍हा रूग्‍णालय मुल, प्राथमिक आरोग्‍य केंद्र मारोडा, राजोली, कोठारी, चिरोली, बेंबाळ, नवेगांव मोरे, चिचपल्‍ली, दुर्गापूर, विसापूर, कळमना याठिकाणी एकूण 14 ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसविण्‍यात आल्‍या आहेत. याशिवाय बल्‍लारपूर शहरात आमदार निधीतुन 25 ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन लवकरच उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे.
बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रामुख्‍याने चंद्रपूर तालुक्‍यातील दुर्गापूर, ऊर्जानगर, चिचपल्‍ली, नागाळा, अजयपूर, वरवट, मोहर्ली, भटाळी, बोर्डा, जुनोना, मामला, चोरगांव बल्‍लारपूर तालुक्‍यातील बामणी, दहेली, कळमना, लावारी, पळसगांव, कवडजई, इटोली, किन्‍ही, गिलबिली, मानोरा, पंचायत समिती बल्‍लारपूर, मुल तालुक्‍यातील चिंचाळा, केळझर, चिरोली, हळदी, भेजगाव, बेंबाळ, नांदगांव, डोंगरगांव, चिखली, पंचायत समिती मुल, पोंभुर्णा तालुक्‍यातील चिंतलबाधा, जुनगांव, भिमणी, नवेगाव मोरे, दिघोरी, चकठाणा, घोसरी, देवाडा खुर्द, जामखुर्द, जामतुकूम, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्‍टा, घनोटी नं. 1, बोर्डा झुल्‍लुरवार, पंचायत समिती पोंभुर्णा या ठिकाणी या 50 ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसविण्‍यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने