आज 35 कोरोना पॉझिटिव्हची नोंद.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1105 झाली आहे. यापैकी 718 बाधित बरे झाले आहेत तर 376 जण उपचार घेत आहेत.
रविवारी एकूण 35 बाधित पुढे आले आहेत. नगीनाबाग येथील 54 वर्षीय कोरोनाबाधितांचा 14 ऑगस्टला मृत्यू झाला यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 9 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.