Bhairav Diwase. Aug 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत 523 वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या वाढत आहे . त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सध्या शेतीकामे सुरु आहे. त्यामुळे कधी रुग्ण सापडेल आणि लॉकडाऊन होतील, याचा सध्यातरी नेम नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 523 लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून 322 बाधित बरे झाले आहेत. सध्या 201 बाधितावर उपचार सुरू आहे.
आज 1 ऑगस्टला जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या बळी गेला. हा कोरोनाबाधित 2 दिवसआधी अमरावती जिल्ह्यातून चंद्रपूर मध्ये आला होता, ज्यावेळी तो आपल्या जिल्ह्यात दाखल झाला त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान आज 1 ऑगस्टला दुपारी त्या रुग्णाचा मृत्यू झाला, तो बाधित 38 वर्षाचा होता, चंद्रपूर शहरातील रहमतनगरचा निवासी होता.प्रशासनाने नागरिकांना स्वतःची काळजी व सावधानता बाळगण्याचे निर्देश दिले आहे.