Bhairav Diwase. Aug 01, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील भाजपा महानगर कार्यालयात आयोजित ऐका कार्यक्रमात आज १ ऑगस्ट शनिवरला नरकेसरी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी चंद्रपूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निबाळकर, भाजप जेष्ठ नेते ऍड. सुरेशजी तालेवार, भाजप जेष्ठ नेते विजय जी राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले,लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे.ते भारतीय स्वातंत्र्याच्या असंतोषाचे जनक होते.वर्तमान पत्राच्या माध्यमातून त्यांनी जन मानस चेतवले. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे इतर काव्य साहित्यातून जनजागृती केली.दोघांचेही कार्य प्रेरणादायी आहे.
*यावेळी समिता यादव, रामकुमार अक्कपेलीवार, धनराज कोवे, रामणारायन रविदास, संजू बौरिया, हिरालाल निषाद, शिवशंकर सोनकर, सुरेश रविदास, शुभम निषाद आदीची उपस्थित होती.दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.