महाराष्ट्र नाभीक महामंडळातर्फे आ. मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न.
Bhairav Diwase. Aug 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र नाभीक महामंडळ तसेच नाभीक सलुन असोसिएशन चंद्रपूर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरा 40 रक्तदात्यांनी सहभाग घेत आ. मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबीराचे उदघाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो अध्यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, महाराष्ट्र नाभीक महासंघ चंद्रपूरचे अध्यक्ष दीपक नक्षीणे, कार्याध्यक्ष रविंद्र येसेकर, जिल्हा प्रतिनिधी संतोष अतकारे, रवि हनुमंते, नामदेवराव क्षीरसागर, श्री. कडवे, श्री. वनस्कर, रत्नाकर वानकर, श्री. उरकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे खरे लोकनेते आहे. जेव्हाही नागरिकांनी त्यांना हाक दिली तेव्हा त्यांनी तत्परतेने हाकेला प्रतिसाद देत नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली आणि विकास प्रक्रीयेला गती दिली. असा लोकनेता चंद्रपूर जिल्हयाला लाभला हे आमचे भाग्य असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी बोलताना नाभिक समाजाचे नेते रविंद्र येसेकर म्हणाले, लॉकडाऊनच्या दरम्यान नाभीक समाज बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यावेळी आम्ही आ. मुनगंटीवार यांना विनंती केली तेव्हा त्यांनी मदतीचा हात देत आम्हाला साथ दिली. या आधीही नाभीक समाजबांधवांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुधीरभाऊंनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांना जनसेवेसाठी दिर्घायुष्य लाभावे, असेही रविंद्र येसेकर म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन पंकज दैवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र हनुमंते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय मांडवकर, विजय महागावकर, महेश आंबेकर, प्रफुल्ल वनस्कर, गुणवंत येसेकर, सतिश जुनारकर, प्रणित वाटेकर, राजू कडवे, कुणाल कडवे आदींनी अथक परिश्रम घेतले.