ग्रामपंचायत कळमना मार्फत pyrethrum chemical ची धूर फवारण

Bhairav Diwase
राजुरा तालुक्यात चिकणगुनिया, डेंग्यू रोगाची साथ चालू असल्याने ग्रामपंचायत मार्फत उपक्रम.
Bhairav Diwase. Aug 01, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग हादरला आहे त्यातच राजुरा तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात चिकन गूनिया, डेंग्यू अशा रोगांची साथ पसरत आहे. राजुरा तालुक्यातील कळमना या गावात चिकन गुनिया आणि डेंग्यू चे काही रोगी सापडल्यामुळे ग्रामपंचायत मार्फत कळमना आणि गट ग्रामपंचायत निंबाळा इथे संपूर्ण परिसरात pyrethrum chemical ची धूर फवारणी करण्यात आली. तसेच गावातील जनतेला परिसर स्वच्छ ठेवा पाण्याची जास्त साठवणूक करू नका जेणेकरून मच्छरांची पैदास होणार नाही. तसेच गावाबाहेर जाताना मास्क च वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. असे ग्रामपंचायत मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
       या उपक्रमासाठी कळमना ग्रामपंचायत चे सचिव खुषाब मानपल्लीवार, ग्राम. सदस्य निलेश वाढई, प्रभाकर पाल, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, सामजिक कार्यकर्ते दिपक झाडे, अमोल उरकुडे, ग्रामपंचायत कर्मचारी श्रावण गेडाम, सुनील मेश्राम, नागोसे तसेच दोन्ही गावच्या गावकऱ्यांनी सहकार्य केले.