रोहित रामदास राकडे (१६) असे मृतकाचे नाव.
Bhairav Diwase. Aug 01, 2020
चंद्रपूर:- नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात आपल्याला इतरांपेक्षा कमी गुण मिळाले, या नैराश्येपोटी सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
रोहित रामदास राकडे (१६) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहितला दहावीमध्ये ४४ टक्के गुण मिळाले आणि तो पास झाला. मात्र इतरांपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो अस्वस्थ होता.
दरम्यान, शुक्रवारी घरच्या सदस्य शेतावर गेल्यानंतर सायंकाळी ४ वाजता त्याने घरातच धाब्यावर चढून दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
सायंकाळी घरची मंडही शेतावरून आली. मात्र मित्रांबरोबर नेहमीप्रमाणे रोहित बाहेर गेला असावा, असे समजून सर्वांनी जेवण आटोपले. त्यानंतर वडील झोपण्यासाठी वरच्या खोलीमध्ये गेले, तेव्हा रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.