Click Here...👇👇👇

वाघाच्या हल्ल्यात मारोडा येथील गुराखी जखमी.

Bhairav Diwase
वाघाने हल्ला केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.
Bhairav Diwase. Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मारोडा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. बैल चारायला गेले असता सोमनाथ प्रकल्प आमटे फार्म येथील फणसाची वाडी येथे दबा धरून बसलेल्या वाघाने मारोडा आदर्श खेडा येथील श्री संतोष ऋषी बोलीवार यांना दुपारी 12 वाजता वाघाने जखमी केल्याची माहिती मिळताच मारोडा येथील वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहचले. व प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे उपचार सुरू करण्यात आला. जखमी रुग्णाना आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्याची मागणी आहे. व प्रशासनानी याची लवकरात लवकर दखल घ्यावी.