आज जिल्ह्यात तब्बल 132 बाधित - दोघांचा मृत्यु.
Bhairav Diwase. Aug 27, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याने आज पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना बाधितांची शंभरी ओलांडताना 132 रुग्णांची भर घातली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799 वर पोहोचली असुन सध्या 696 रुग्ण उपचार घेत असुन 1081 रुग्ण बरे झाले आहेत.
त्याचबरोबर आज जिल्ह्यात 2 बाधितांचा मृत्यु झाला असुन मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर येथिल 52 वर्षीय पुरुष तर पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथिल 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला आहे.