पुरोगामी पत्रकार संघ पिडीत प्रतिनिधीच्या पाठीशी
पिडीत प्रतिनिधींच्या समर्थनार्थ एस.पी.ची घेणार भेट
प्रतिनिधीवर लावलेले गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा जिल्हाभर आंदोलन.
Bhairav Diwase. Aug 27, 2020
चंद्रपूर:- जिल्ह्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या मांडणारी बातमी एका युट्यूब चॅनल चे प्रतिनिधी गणेश इसनकर यांनी आपल्या माध्यमातून मांडली. परंतु तेथील विद्यमान सरपंच यांनी त्या बातमी ला खोटे ठरवत संपादक राजकुमार खोब्रागडे, प्रतिनिधी गणेश इसनकर यांच्या सह मीना मेश्राम, रीना गेडाम, कुसुम मंगल, या महिलांवर ही तेथील ठाणेदारांनी कोणतीही पुर्व चौकशी न करता गुन्हे दाखल केले आहेत. ही अराजकता असून, मुस्कटदाबी चा हा भयंकर प्रकार असल्याने पुरोगामी पत्रकार संघ या घटनेचा तीव्र निषेध करत युट्यूब वहिनी चे प्रतिनिधी आणि जनतेवर लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
पुरोगामी पत्रकार संघ पिडीत प्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन अशा मुस्कटदाबी विरोधात आंदोलनात्मक उग्र भुमिका घेणार असल्याचे संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, उपाध्यक्ष राकेश सोमाणी, जिल्हा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे, जिल्हा प्रभारी निलेश ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
त्या प्रतिनिधी आणि महिलांवर दाखल केलेले खोटे गुंन्हे त्वरित मागे घेण्यासाठी उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पुरोगामी पत्रकार संघाचे शिष्टमंडळ भेटणार असून गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहेत. जर या गंभीर घटनेची दखल घेतल्या गेली नाही व लावलेले खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर, या अराजकते विरुद्ध पुरोगामी पत्रकार संघ इतर पत्रकार संघटनेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.