आधार न्यूज नेटवर्कचा पहिला व दुसरा उपक्रम यशस्वी.
आधार न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक भैरव धनराज दिवसे यांच्या नेतृत्त्वात.
Bhairav Diwase. Aug 27, 2020
पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू पसरायला सुरुवात झाली. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आले. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत होते. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे दैनंदिन मजुरीच्या आधारे कुटुंब जगविणाऱ्या लोकांना जीवन जगतांना खूप अडचणी निर्माण झाल्या, दोन वेळा जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शा कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. आधार न्यूज नेटवर्क तर्फे एक हात मदतीचा हा पहिला उपक्रम राबविला होता. आधार न्यूज नेटवर्क नी गरजु लोकांन पर्यंत पोहचुन त्याना जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप करण्यात आले होते. त्यावेळी गरजु लोकांनी आधार न्यूज नेटवर्क चे मनापासून आभार मानले होते.
जगा सह भारत देश व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना काळात पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता शिपाई, कृषी अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, बँक अधिकारी, आशा तसेच अनेक अधिकारी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी योध्ये म्हणून कार्यरत आहे. अनेक क्षेत्रातुन कोरोना योध्दांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आधार न्यूज नेटवर्क तर्फे कोरोना योद्धाचा सन्मान हा दुसरा उपक्रम राबवण्यात आला. दिनांक 26 ऑगस्ट 2020 ला आधार न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक भैरव धनराज दिवसे यांच्या नेतृत्वाखाली आधार न्यूज नेटवर्क चे तालुका प्रतिनिधी स्वप्नील मनोहर मंडोगडे यांनी पोंभूर्णा तालुक्यातील कोरोना योद्धांना (आशा वर्कर, पोलिस) सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
चेक आष्टा:-
येथील आशा वर्कर सौ. शामला मडावी , उपस्थित ग्रामपंचायत सरपंच जयंत पिंपळशेंडे
आष्टा:-
येथील आशा वर्कर वनिता बोडेकार, उपस्थित ग्रामपंचायत सरपंच हरीष ढवस
सोनापुर:-
येथील आशा वर्कर शितल चौधरी, उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच कल्पना गौरकार.
बल्लारपुर:-
येथील आशा वर्कर माया ढुमणे, उपस्थित ग्रामपंचायत सरपंच दशरथ फरकडे.
चिंतलधाबा:-
येथील आशा वर्कर आशा राऊत.
देवाडा खुर्द:-
आरोग्यवर्धिनी केंद्र. प्रा. आ उपकेंद्र. देवाडा खुर्द आशा वर्कर कविता देऊरमल्ले, जामतुकुम आशा वर्कर वंदना गद्देकार, जामखुर्द आशा वर्कर स्वाती मडावी, रामपुर दिक्षित आशा वर्कर प्रतिक्षा कातकर. उपस्थित सौ. ज्योतीताई बुरांडे पंचायत समिती उपसभापती पोंभुर्णा, श्री भालचंद्रभाऊ बोधलकर सरपंच ग्रामपंचायत जामतुकुम
चेक हत्तीबोडी:-
येथील आशा वर्कर प्रतिक्षा बुरांडे, उपस्थित पत्रकार श्री जवाहर धोडरे सकाळ.
उमरी पोतदार:-
येथील आशा वर्कर अंतकला हजारे, उपस्थित ग्रामपंचायत सरपंच वनिता सिडाम.
घनोटी तुकुम:-
येथील आशा वर्कर सुलभा कुळमेथे.
बोर्डा बोरकर:-
येथील आशा वर्कर वर्षा चिचघरे.
तसेच
उप- पोलिस स्टेशन उमरी पोतदार.
उप-पोलिस स्टेशन पोंभुर्णा
यांना आधार न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक आधार न्यूज नेटवर्क भैरव धनराज दिवसे, आधार न्यूज नेटवर्क चे पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी स्वप्नील मनोहर मंडोगडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.'