Top News

आसोलामेंढा नहरात बुडून भावी सीआरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू.

गौतम वनकर या तरुणाचा तोल जावून नहरात पडल्याने तो फसला गेला आणि त्याला पोहणे अशक्य झाल्याने त्याचा त्यात बुडून दुर्दैवी मृत्यू .
Bhairav Diwase.    Aug 02, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- गोसेखुर्द आसोलामेंढा तलावाचा मुख्य नहर सावली शहराजवळून जातो , पावसाने दडी मारल्याने नुकताच शेतकऱ्यांची पाण्याची टंचाई लक्षात घेता नहराला आसोलामेंढा तलावातुन पाणी सोडण्यात आले, नहराच्या गौतम वनकर या तरुणाचा तोल जावून नहरात पडल्याने तो फसला गेला आणि त्याला पोहणे अशक्य झाल्याने त्याचा त्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर मृतक युवक हा नुकत्याच झालेल्या सिआरपीएफ भरती मध्ये पात्र उमेदवार ठरलेला होता. परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभर लाकडाऊन व संचारबंदी करण्यात आली त्यामुळे पद भरती प्रक्रिया थांबविण्यात आल्या , आज अचानक तो नहराकडे फिरायला गेल्याने व पोहता न येत असल्याने त्याचा मृत्यू झाला.
आसोलामेंढा तलावाच्या मुख्य नहराचे काम सुरू आहे , खोलीकरण करण्यात येत आहे यात सिमेंट कांक्रीट चा वापर करण्यात येत असल्याने एखाद्या वेळेस तोल जाऊन व्यक्ती पडल्यास त्याला पोहणी करण्यास किंवा बाहेर निघण्यासाठी अडथळा निर्माण होतो . असाच प्रकार आज घडला , शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे , सिंचनासाठी सुविधा व्हावी या हेतूने बांधण्यात आलेल्या या नहरात मात्र खोलीकरण व सिमेंट कांक्रींट च्या मजबुती कारणांमुळे हा नहर जिवघेणा ठरत आहे.
अचानक गौतम वनकर च्या दुर्दैवी मृत्यू मुळे कुटुंबासह सावली शहरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने