सावली तालुक्यातील पाथरी व गेवरा या आदिवासी गावांमध्ये गर्भवती महिला तपासणी शिबिर आयोजित.

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर द्वारा “ जननी व शिशू ” सुरक्षा संबंधी कार्यक्रम संपन्न.
Bhairav Diwase.    Aug 02, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर च्या माध्यमातून सावली तालुक्यातील पाथरी व गेवरा या आदिवासी गावांमध्ये गर्भवती महिला तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र गेवरा या दोन ठिकाणी गर्भवती महिलांची तपासणी करून रोटेरियन डॉक्टर आसावरी देवतळे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. काही महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी सल्ला देण्यात आला. तिथे उपस्थित महिलांची लहान बाळे होती त्याना मच्छरदाणी चे वाटप करण्यात आले, त्याच प्रमाणे कोरोना चा संसर्ग लक्षात घेता महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले .त्याचप्रमाणे त्यांना नेलकटर चे आणि आणि डेटॉल साबणाचे वाटपही करण्यात आले. या दोनही आरोग्य केंद्रांमधील महिलांना सॅनेटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले . डाॅक्टर आसावरी देवतळे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून विटामिन आणि टॉनिक चे वाटप करण्यात आले.
तिथे उपस्थित सर्व गर्भवती महिला हाय रिस्क आल्या होत्या. उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर , सिस्टर, भगिनी ,आशा वर्कर आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाला आयपीपी स्मिता ठाकरे सुद्धा उपस्थित होते.रुग्णांना तपासणीनंतर डॉक्टर आसावरी देवतळे यांचे आभार मानले पुढील महिन्यात पुन्हा आम्हाला तपासायला या अशा प्रकारची मागणी सुद्धा महिलांकडून झाली.
अशा दोन आदिवासी ठिकाणचा कार्यक्रम जननी शिशु सुरक्षा संबंधित कार्यक्रम रोटरी क्लबच्या वतीने संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत