स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थांना एच्छिक परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी द्या:- आ. किशोर जोरगेवार

Bhairav Diwase
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.
Bhairav Diwase.    Aug 02, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातून  पुणे, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद  येथे गेलेले विद्यार्थी आता स्वगृही परतले असतानास  राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र  परीक्षेची तयारी करणाऱ्या  युवकांनी जिथे तयारी करत होते तेच केंद्र निवडले असल्याने आजची  स्थिती बघता परीक्षा केंद्र गाठणे या विद्यार्थ्यांना  शक्य नाही. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता या विद्यार्थांना एच्छिक परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी   देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.