राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर बचावले अपघातात.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- जिल्हा परिषद सर्कलची बैठक आटोपून येत असताना राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच 34 एएम 3595 चा दुर्गापूर जवळील वडोळी या गावाजवळ अचानक ट्रॅक्टर मध्ये आल्याने हा अपघात झाला . वाहनांचा वेग कमी असल्याने गाडी रस्त्याखाली उतरून झुडपाच्या दिशेने वळाल्याने सर्व बचावले . सुदैवाने कुणालाही या अपघातात दुखापत झाली नाही , युवक कांग्रेस जिल्ह्याध्यक्ष नितीन भटारकर हे नेहमीच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करीत असतात . आज 23 ऑगस्टला अशीच बैठक आटोपून येत असताना हा अपघात झाला यावेळी यांच्यासह माजी सरपंच अमोल ठाकरे , पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे सोबत होते .