राजुरा येथे ओबीसी समन्वय समिती गठीत.

तालुका अध्यक्ष पदी उत्पल गोरे तर तालुका महासचिव पदी सुरज गव्हाने यांची निवड.
Bhairav Diwase.    Aug 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- 7 ऑगस्टला मंडल आयोग दिनाचे औचित्य साधून  राजुरा येथे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच 2021 च्या जनगणना मध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी व ओबीसीच्या ईतरही मागण्यासाठी राजुरा तालुका मध्ये  ओबीसी नेते दिनेश भाऊ पारखी व अँड अंजली ताई साळवे विटणकर  मॅडम यांच्या  मार्गदर्शनाखाली ओबीसी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे या मध्ये राजुरा तालुका अध्यक्ष पदी उत्पल गोरे तर तालुका महासचिव पदी सुरज गव्हाने यांची निवड करण्यात आली. या वेळी प्रामुख्याने ओबीसी नेते दिनेश भाऊ पारखी, लक्ष्मण तुराणकर सर तसेच युवा मार्गदर्शक केतन जुनघरे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत