बल्लारपुर तालुक्यात गोळीबार.

Bhairav Diwase
सुरज बहुरिया वर भर चौकात गोळीबार.

तब्बल सहा गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज.
Bhairav Diwase.    Aug 08, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना सुरज बहुरिया नामक युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणाव आहे. 


पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ घटात परीसर ताब्यात घेतला असून प्रतिदर्शीनुसार सुरज बहुरिया वर अंदाजे 5-6 गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या विरोधीगटात सातत्याने  वाढते गँग वॉर चिंतेचा विषय आहे. हे गोळीबार प्रकरण सुद्धा याच गँग वॉर चा भाग असल्याचे चर्चेत आहे.