नगर अभियंत्यास नगरसेवकांची मारहाण.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   Aug 10, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- बोल नगरपरिषदेचे अभियंता प्रसाद राठोड यांना मूळ नगरपरिषदेचे नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी मारहाण केल्याची घटना आज घडली. यामुळे शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी नगरसेवक करकाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभियंता राठोड यांना मारहाण करण्यांचे घटनेसोबतच, महेंद्र करकाळे यांनी, नगर परिषदेचे अधिक्षक विलास कागदेलवार यांनाही मारहाण केल्याची आणि मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेशी बाचाबाची करून उध्दट उत्तरे दिल्याची तक्रार प्रसाद राठोड यांनी मूल पोलिसात दिली  आहे.   


दरम्यान या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून, आज (दिनांक 10) पासून नगर परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यांचा निर्णय नपच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.  त्यामुळे हा वाद आणखी चिघडण्याची शक्यता आहे.

प्रसाद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही कामे पेंडीग असल्यांने, ते नपत कामासाठी आले होते.  ते परत निघत असतांना बाहेर नगर परिषदेचे सभापती विनोद सिडाम, प्रशांत लाडवे, नगरसेवक अनिल साखरकर उपस्थित होते.  विनोद सिडाम यांचेसोबत त्यांचे प्रभागातील कामाबाबत चर्चा सुरू असतांनाच, प्रभाग ७ ब चे नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी प्लॉस्टिकच्या खुर्चीने राठोड यांना मारहाण सुरू केले. शिवीगाळही दिली.  उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा वाद सोडविला.  यानंतर, करकाडे यांनी, नपचे विलास कागदेलवार यांनाही मारहाण केली, तर याबाबत माहीती घेण्यांचा प्रयत्‍न करणारे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेशी बाचाबाची करून, उदध्टपणे उत्तर दिले.

नगर अभियंता, हे नगरसेवकांचे न ऐकताच स्वमर्जीने कामे करतात, लोकांचा रोष माञ नगरसेवकांना सहन करावा लागतो.  यामुळे अभियंता आणि नगरसेवक यांचेत जुनाच वाद आहे. हा वाद अनेकदा नगर परिषदेच्या मासिक बैठकीतही दिसून येत होता.  

मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी या घटनेचा निषेध केला आहे.