कित्येक वर्षांपासून अडलेला रस्ता नगर परिषद उपाअध्यक्ष शरद जोगी यांच्या प्रयत्नातून मार्ग झाला मोकळा.

Bhairav Diwase
नगर प्रशासनाला माहितीच नव्हत इथून रस्ता आहे?
Bhairav Diwase. Aug 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- मागील कित्येक वर्षांपासून वॉर्ड नो 5 येथील पंचशील पथका पासून एक गल्ली डॉ ठाकरे यांच्या दवाखण्याकडे जाणारा रस्ता प्रलंबित होता किंव्हा असेही म्हणतात की हा रस्ताच नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास नव्हता. प्रभाग १ येथील पंचशील झेंड्या जवळील रोड हा सरळ महामार्गावर निघाल्या मुळे येथील समस्या सुटली .
मागील काही दिवसापासून गडचांदुर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री शरद जोगी यांनी स्थानिक लोकांच्या मागणीनुसार हा रस्ता मोकळा करून देण्यात आला.
या जागेवरून नागरिकांना येतं जाता फार त्रास व्हयाचा पण प्रशासनाने यापूर्वी या मार्गाकडे किंव्हा स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे कधीही लक्ष दिले नाही, पण नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांना जेव्हा ही समस्या कळाली तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या जागेवरील पडीक घर पाडून रस्ता मोकळा करून दिला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद जोगी , नगरसेविका तथा गटनेत्या कल्पना निमजे, नगरसेविका सौ अश्विनी कांबळे,नगरसेविका मीनाक्षी एकरे, पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण मेश्राम , प्रफुल मेश्राम .सदू भाऊ गिरी.आकाश वराटे . निखिल एकरे सत्वान शिंग. करण शिंग. कुसांडे ताई, रविभाऊ, व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हे कार्य पार पाडले.