पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, पशुवैद्यकीय विभाग सर्वतोपरी सेवेसाठी उपलब्ध.:- अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले.
Bhairav Diwase. Aug 18, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूरजिल्ह्यात जनावरांवर आलेल्या त्वचेच्या लम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. हे प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क असून याकरिता जि. प. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची, तालुकांतर्गत चालू असलेल्या लसीकरणाची माहीती देण्यायाकरिता आज शहरातील चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात जि. प. ची पत्रकार परिषद पार पडली.
जनावरांवर आलेल्या लम्पी या रोगाचे निदान करता यावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावस्तरावर जनावरांसाठी तपासणी शिबीरे सुरू असून लसीकरण व उपचार करणे सुरू झालेले आहे. तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या आजाराचे गांभीर्य ओळखून आपल्या निधीतून १० लक्ष मंजुर केले आहेत. त्याकरिता शेतकरी व पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्याकडील जनावरांमध्ये लम्पी सदृश रोगाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावे असे आव्हान जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी या पत्रकार परिषदेत बोलतांना केले.
यावेळी, जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनीलभाऊ ऊरकुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे यांसह जिल्ह्यातील प्रमुख पत्रकारबांधव उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत