Top News

उमरी पोतदार येथील गावकऱ्यांचा थेट पोलिस स्टेशन मध्ये आक्रोश.

दारु विक्रेत्यांच्या विरोधात पोलिस स्टेशन येथे धाव घेत, गावामध्ये दारु बंद करावे. अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
Bhairav Diwase. Aug 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे पोळा तर साजरा झाला नाही परंतु अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात झाली. पोंभुर्णा तालुक्यांतील उमरी पोतदार पोलीस स्टेशन च्या हद्दीतच गावामध्ये अवैध दारू विक्री झाल्यामुळे लोंकामध्ये असंतोष निर्माण झाला.उमरी पोतदार पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार आल्याने अवैद्य दारू विक्रेत्यांनी डोके वर काढीत ठाणेदारांशी आर्थिक संगनमत करुन अवैद्य दारू विक्रीला सुरुवात केली आहे. अशी चर्चा गावांमध्ये सुरू झाली आहे. दारू विक्रेत्या मध्ये आणि गावातील लोकांमध्ये वादविवाद झाला. दारु विक्रेत्यांनी १ महिलाला जिवे मारण्याची धमकी दिली. 
त्याचाच परिणाम म्हणून रात्री उशिरा लोक थेट पोलिस स्टेशन गाठत दारु विक्रेत्यांच्या विरोधात पोलिस स्टेशन येथे धाव घेत त्वरीत गावामध्ये दारु बंद करावे.
 ही मागणी गावकऱ्यांनी ठानेदाराकड़े केली आहे. पोलिस हे दारु विक्रेत्याडुन हप्ता घेवुण अवैध रित्या दारू विक्री सूरु केली असे गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आणि त्यामुळे दारु विक्रेत्यांची हिंमत वाढलेली आहे असे दिसुन येत आहे. त्यामुळे गावात एकच खडबड निर्माण झाली व असंतोष निर्माण होऊन गावकरी स्टेशन मध्ये जाऊन दारु बंद करावे ही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

या दारु विक्रेत्यांच्या पाठिशी कोण? दारु विक्रेत्यांना अभय कुणाचे? या दारु विक्रेत्यांवर कारवाई होणार का? गावांमध्ये पोलिस स्टेशन असुन या दारु विक्रेत्यांना कुणाचीच भिती नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थीत होत आहे.


 त्यामुळेच दारु विक्रेत्यांची हिंमत वाढलेली आहे. त्यामुळे अशा हप्ता खोर पोलीस ठाणेदाराला ताबडतोब निलंबित करुन होत असलेली बेकायदेशीर दारू विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी गावकऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. त्या ठानेदारावर वरीष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार. याकडे संपूर्ण गावकऱ्यांच लक्ष लागली आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने