Click Here...👇👇👇

लॉक डाउन च्या शेवटच्या दिवशीच विरूर अडकला संपूर्ण कंटेंटमेंट झोन मध्ये.

Bhairav Diwase
विरुरात आज बारा पोजिटिव्ह रुग्णाची नोंद.
Bhairav Diwase.    Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राज्यात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत असताना  आज लॉक डाउन च्या शेवटच्या दिवशीच रुगणात पुन्हा भर होऊन ग्रामीण भाग असलेल्या विरुतात  आज बारा रुग्णाची नोंद झाल्याने  विरुर च्या सर्व सीमा बंद करून  संपूर्ण कंटेंटमेंट  झोन घोषित करण्यात आले व आता कोरोना रुग्णात वाढ होऊन ती संख्या 26 वर पोहचली आहे 
     विरुर या गावात कोरोनाच  प्रादुर्भाव हा वेगाने वाढत असल्याने विरुर हे संपूर्ण गावं कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले  यावेळी स्वतः   डॉ रवींद्र होळी तहसीलदार राजुरा , कृशनकुमार तिवारी ठाणेदार विरूर व भग्यश्री आत्राम सरपंच विरुर यांच्य उपस्थित प्रशासनाने संपूर्ण गावाला सील करण्यात आले ,आणि 13 सप्टेंबर पर्यन्त बाहेरील वैक्तीस ,वाहनास सक्त मनाई केली असून फक्त अत्यावश्यक वैक्तीस प्रशासनाच्या परवानगीनेच बाहेर जाता येईल असें प्रशासन कडून सांगण्यात आले.