Top News

ग्राम पंचायत महिला सदस्याच्या उपोषणाची प्रहारने घेतली दखल.

न्याय न मिळाल्यास प्रहार करणार आंदोलन.
Bhairav  Diwase.    Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नांदा येथील राम अवतार नावधंर यानी घरालगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्यामुळे ग्राम पंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी व नागरिकांनी ग्राम पंचायत प्रशासनच्या निदर्शनास आणून दिली तरीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८चे कलम ५३ पालन ग्राम पंचायत नांदा करीत नसल्याने ग्राम पंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तिन दिवसांनी तब्येत खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रहारचे नेते सुरज ठाकरे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली असता नागरिकांनी त्यांना प्रकरणाची माहिती देण्यात आली की तहसील कार्यालयातील, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, पोलिस ठाण्यातील अधिकारी, उपोषण स्थळाकडे फिरकले सुध्दा नाही. यामुळे प्रशासना विरोधात गावातील नागरिकांचा रोष आहे.

गडचांदूर नगर परिषदेचे सफाई कामगारांना सुध्दा आठ महिने झाले तरी त्यांचे वेतन दिले नाही व कामावरून कमी करण्याच्या धमक्या सफाई कामगारांना नगर परिषद प्रशासनातर्फे देण्यात येत आहे अशा समस्या ठाकरे यांच्या समोर सफाई कामगारांनी मांडल्या असता ठाकरे यांनी सांगितले की २०१५ साली ग्राम पंचायतीचे अधिपत्य जावून नगर परिषदेचा कारभार सुरू झाला तर त्या वेळी शहरात ९९ सफाई कामगार कामावर होतो त्यामुळे त्यावेळी च्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी एक ठराव संमत करून शहरातील लोकसंख्या वाढत जाईल तसतसे नवीन सफाई कामगार कामावर घेतले जाईल आता शहरातील लोकसंख्या तिस हजारांच्या घरात असून सफाई कामगार मात्र तेवढेच आहे आणि आता तर नगर परिषदेने ठराव मंजूर करून एक हजार लोकांना साठी एक सफाई कामगार राहतील म्हणजे काय नव्यानव कामगारांपैकी चाळीस पन्नास कामगार बेरोजगार होतील अशा वेळी सफाई कामगारांना दिलासा देत सांगितले की येत्या दि ३,ते१३तारखे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात टाळेबंदी लागणार असल्याने सफाई कामगार आपापली कामे करणार आहे नगर परिषदेला इशारा देत सफाई कामगारांचे वेतनाचा प्रश्न लवकर निकाली काढण्यात आला नाही तर येत्या१५तारखे नंतर आंदोलन करण्यात येईल.

सोनुर्ली गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत तातडीने काही समस्या सोडविण्यात आल्या काही समस्यांचे लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे नांदा फाटा येथील अतिक्रमणाचा प्रश्र्न गडचांदूर मधील सफाई कामगारांचे वेतनाचा प्रश्न येणाऱ्या १५ सप्टेंबर पर्यंत नाही सोडविण्यात नाही आले तर प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असे प्रहार संघटनेचे नेते सुरज ठाकरे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने