घाटकुळ येथे रक्तदान शिबिर ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

मराठा व जनहित युवक मंडळ व ग्रामपंचायतीचे आयोजन.

१५ युवकांचे रक्तदान ; दहावी, बारावीत तालुक्यात अव्वल ठरले विद्यार्थी.
Bhairav Diwase. Aug 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राज्यात आदर्श ग्राम म्हणून नावलौकिक तालुक्यातील घाटकुळ येथे भव्य रक्तदान शिबिर व दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. मराठा युवक मंडळ, युवा जनहित बहुउद्देशीय संस्था व ग्रामपंचायतीच्या माध्यमाने आयोजित ज्ञानगंगा सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. घाटकुळ गावात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येते. कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात पडत आहे. हीच बाब लक्षात घेऊन गावातील युवा जनहित बहुउद्देशीय संस्था, मराठा युवक मंडळ व ग्रामपंचायतीने रक्तदानाचे आयोजन केले.

यंदा तालुक्यात प्रथम द्वितीय व तृतीय तसेच गुणवत्ता यादीत घाटकुळ येथील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यात वैष्णव देऊरघरे, रिया देशमुख, काजल राळेगावकर, अस्मिता वाकुडकर, प्रथम वाकुडकर, सौरव राऊत यांचा समावेश असून त्यांना पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रीती मेदाळे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, ग्रामसेवक ममता बक्षी, अविनाश पोईनकर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रफुल निमसरकार, ठाकरे चनकापुरे, खोब्रागडे तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आरके, भंडारे उपस्थित होते. रक्तदान शिबिरात स्वप्नील बुटले, सचिन गरुडवा, योगेश देशमुख, अनुप चौधरी, संदीप सुंबटकर, मुकुंदा हासे, अमोल गुळी, व्यंकटेश राळेगावकर, स्वप्नील राऊत, अक्षय दोरीवार, राजेश्वर दुर्गे, बापूजी मेदाडे, शुभम कानकाटे, रितीक शिंदे, रविदास मडावी यासह १५ युवकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राम चौधरी, अनिल हासे, उत्तम देशमुख व युवक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ.पवार, डॉ.रामटेके यांनी विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत