भाजपा गोंडपीपरी तर्फे आरोपीवर कारवाईची मागणी.
मुख्यमंत्र्याना पाठविले पत्र.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- नागभीड तालुक्यातील कसर्ला या गावच्या दहावी पास झालेल्या मुलीवर बलात्कार केला.सदर मुलीने चिठ्ठी लिहून शेतावर जातांना नराधमांनी माझा गळा दाबून बलात्कार केल्याचे स्पष्ट लिहिले आहे. यामुलीची आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले आहे.
त्यामुळे अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी भाजपा गोंडपीपरीचे पदाधिकारी यांनी केली आहे याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष बबन निकोडे,भाजपा नेते गणपती चौधरी, साईनाथ मास्टे भाजपा कार्याध्यक्ष गोंडपीपरी , सुहास माडूरवार सामाजिक नेते , दीपक सातपुते माजी सभापती प.स. गोंडपीपरी, मनीष वासमवार माजी उपसभापती प.स.गोंडपीपरी, संजय झाडे माजी नगराध्यक्ष, जितेंद्र ईटेकार नगरसेवक , अनिल झाडे सर, भानेश येगेवार ढूमने पाटील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते