Click Here...👇👇👇

सीएसटीपीएस येथे मुक्तसंचार असलेल्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा.

Bhairav Diwase
आ. किशोर जोरगेवार यांची वन विभागाच्या प्रधान सचिव यांना मागणी.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर पाच वर्षांच्या चिमूकलीला आई समोरच बिबट्याने उचलून नेल्याची घटना काल सीएसटीपीएसच्या वसाहतीत घडली. या घटनेत चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर यांची भेट घेतली असून सीएसटीपिएस परिसरात मुक्तसंचार असलेल्या श्वापदांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.