जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कॅन्सरग्रस्त पेशंटच्या ट्रिटमेंटसाठी दिला सहाय्यता निधीचा धनादेश.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 27, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- मारडा मोठा ता. चंद्रपुर येथील संजय नानाजी टोंगे यांची कॅन्सरची ट्रिटमेंट चालू असुन त्यांना ट्रिटमेंटसाठी पैश्याची नितांत आवशक्ता होती. ट्रिटमेंटला जाण्यासाठी पैसे देखील नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. औषधोपचारासाठी पैश्यांअभावी ट्रिटमेंट मध्ये खंङ पडल्याने शारिरीक वेदना होत होत्या.
लॉकङाऊनच्या काळात सर्वांचीच अङचण मदतीची कोणाकडून अपेक्षा ठेवणार. पण म्हणतात ना "अडचणीच्या काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र".
पेशंटचे मित्र संबंध असणारे श्री. करण (बंङू) गौरकार यांनी पेशंटच्यावतीने कागदपत्र तयार करून जिल्हा परिषदकङून ट्रिटमेंटसाठी मदत मिळणेसाठी अर्ज केला. आरोग्य विभागातील अधिकारी वर्ग यांचेकडे योग्य कागदपत्रांच्या सादरीकरणानंतर पेशंटच्या वतीने श्री. करण गौरकार यांनी जि.प. उपाध्यक्ष सौ. रेखाताई कारेकर आणी श्री. ब्रिजभुषण पाझारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पेशंटची परिस्थिती ट्रिटमेंटसाठी पैश्यांची अत्यंत आवशक्ता विनंतीत केली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. रेखाताई कारेकर आणी ब्रिजभुषण पाझारे जि.प. सदस्य यांनी तातडीने आरोग्य विभागास यासंदर्भात योग्य कामकाज करण्यात येऊन अर्थसहाय्य देण्याचे निर्देश दिले आणी पेशंट श्री. संजय टोंगे यांना ट्रिटमेंटसाठी अर्थसहाय्यचा धनादेश देण्यात आला. त्यावेळीस भाजप नेते श्री. सुभाष कासनगोट्टूवार यांनी पेशंटची प्रत्यक्ष भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. आमीन शेख,आशिष ताजने यावेळी उपस्थीत होते.
अडचणीतील काळात ट्रिटमेंटसाठी मिळालेल्या अर्थसहाय्यासाठी पेशंट आणी त्यांचे परिवार यांनी सौ. रेखाताई कारेकर आणी श्री. ब्रिजभुषण पाझारे, आरोग्य विभाग यांचे आभार मानले.
आरोग्य विभागाचे ङॉ. जि.व्ही. राऊत आणी श्री. अतुल येरमे यांनी कार्यालयीन कामकाजात मार्गदर्शन सहकार्य केले.