Top News

चिमूर तालुका कृषी विभागाअंतर्गत रानभाजी मोहोत्सवाचे उद्घाटन संपन्न.

Bhairav Diwase. Aug 09, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुका कृषी विभागामार्फत रानभाजी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक अधिकारी यांनी मार्गदर्शन करून निरनिराळ्या आरोग्यासाठी उपयोगी पडणाऱ्या रानभाज्या प्रदर्शनात आणण्यासाठी चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले .व त्याचा परिणाम चिमूर येथील चावडीवर रानभाजी महोत्सव घेऊन विक्री व प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित केले .
त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांना निमंत्रित केले होते. स्वतः कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचे निमंत्रण आमदार मोहोदय यांना दिले परंतु आमदार यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्यामजी हटवादे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर श्यामजी हटवादे यांच्या हस्ते करण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांनी व लोकांनी यात सहभाग घेतला व अनेक शेतकऱ्यांनी या सहभाग दाखवल्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांनी श्री तिखे साहेब सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला सौ.मायाबाई नन्नावरे,कृषी अधिकारी श्री तिखे, चिमूर तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने