सावली तालुक्यात कोरोना चा रुग्ण आढळला.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. Aug 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:-
सावली तालुका कोरोना मुक्त असतांनाच काही दिवसापूर्वी सावली तालुक्यात बाहेर गावावरून आलेला रुग्ण हा पॉझिटिव्ह होता.आणि त्यांनी सुरुवात करीत आत्तापर्यंत 3 रुग्ण होते.आज मात्र तालुक्यातील हिरापूर येथील एक महिला ही मुख्यमार्गाच्या कामावर स्वयंमपाक करण्यासाठी जात होती. तिला 2 दिवसापासून ताप येत होता ती बोथली येथील आरोग्य केंद्रामध्ये तपासणी केली.तिची कोरोना ची टेस्ट घेण्यात आलेली होती. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली असून आत्तापर्यंत ची सावली तालुक्यातील पॉझिटिव्ह संख्या ही 4 झालेली आहे. सदर महिला ही कुना कुणाचा संपर्कात आली याची पाहणी करण्यात येणार असून सावली तालुक्यातील उत्तम प्रशासन पुन्हा सतर्क होऊन काम पार पाडत असल्याचे दिसत आहे.