युवकांनी पोलिसांची दुचाकी जाळली.


सोनुर्ली गावातील घटना.
Bhairav Diwase. Aug 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलिस ठाणे अंतर्गत सोनुर्ली गावातील काही युवकांनी आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान कोरपना पोलीस ठाण्यात कार्यरत बीट जमादार सुधीर तिवारी यांच्या पल्सर गाडीला आग लावून जाळल्याची घटना घडली.
आज सकाळी घरगुती वादातून आई वडिलांच्या मागे धारदार वस्तूने धाक दाखवत असल्याकारणाने नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता माहिती कोरपना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा त्यांनी घरावर चढून पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक होताच पोलिसांनी जीव वाचवण्याच्या भीतीपोटी पळापळ केली. पोलीस बाजूला होताच युवकाने पोलिसांच्या दुचाकीला आग लावून संपूर्ण गाडी जळून खाक केली गावात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने