Top News

अल्पवयीन मुलींवरील लैंगीक अत्याचारावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मौनच अत्याचार वाढविण्यास कारणीभूत.

आम आदमी पार्टीच्या नेत्या ॲङ पारोमिता गोस्वामी यांचा आरोप
Bhairav Diwase. Aug 11 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयात अल्पवयीन मुलीवर वाढत्या अत्याचारास जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेच अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या ॲङ पारोमिता गोस्वामी यांनी केला.

ॲङ गोस्वामी यांनी आज, आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह मध्ये ‘’लॉकडाऊनच्या काळातील महिला सुरक्षा” विषयावर त्यांनी मत मांडले.

राज्य शासनाच्या अहवालात लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढत असल्यांचा स्पष्ट उल्लेख आहे.  कोरोणाच्या संक्रमनाचे काळात फक्त राज्यातच नव्हे तर जगात ही नवी समस्या उभी झाली आहे, याचा उल्लेख करीत, त्यांनी मागील दहा-पंधरा दिवसात, चंद्रपूर जिल्हयातील चार महिला अत्याचारांच्या प्रकरणाचा उल्लेख करीत, पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेच महिला अत्याचाराचे  प्रकरणात गंभीर नसल्यांने इतर प्रशासकीय अधिकारीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला.

पालकमंत्रीच्या कामाचे प्राधान्यक्रम ज्या विषयाचे दिशेने असते, त्याच दिशेने प्रशासकीय यंत्रणा काम करीत असते.  मात्र जिल्हयातच नव्हे तर, खुद्द पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मतदार संघ असलेल्या सावली तालुक्यात दहा दिवसात 3 अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.  पॉस्को दाखल करण्यात आले. मात्र मनोधैर्यचा लाभ अजूनही मिळाला नाही, याकडे ॲङ गोस्वामी यांनी लक्ष वेधले.  हे तीन प्रकरणे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मतदार संघात उघडकीस येवूनही, त्यांनी या बद्दल तीन शब्दही बोलले नाही.  यावरून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनाच हे प्रकरण गंभीर  वाटत  नसल्यांचे दिसून येते व यामुळेच अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत असा आरोप ॲङ गोस्वामी यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला.  पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्यांनेच, नागभीड तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि त्यात तीने आत्महत्या केली याकडे ॲङ गोस्वामी यांनी लक्ष वेधले. सावली तालुक्यातील अत्याचार करणाऱ्यांना पालकमंत्रीने ठणकाविले असते, तर प्रशासनाला तसे संकेत गेले असते, आणि अत्याचारावर आळा बसला असता असे मत त्यानी व्यक्त केले.

प्रत्येक जिल्हयाचे पालकमंत्रीने महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी विनंतीही त्यानी यावेळी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने