Bhairav Diwase. Aug 11, 2020
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथे दिनांक 11 ऑगस्टच्या सकाळच्या सुमारास अतिवृष्टीने घराची भिंत कोसळून एक इसम ठार झाल्याची घटना घडली निलकंठ नथू पाल (वय 75) असे मृतक इसमाचे नाव आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप चालू होती अशातच वांद्रा येथील नीलकंठ पाल यांनी जुन्या घरातील पावसामुळे ओले झालेले साहित्य बाजूला करीत असताना घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळून पडल्याने नीलकंठ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी विशाल कोरडे व मेंडकी चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल खुशाल उराडे पवन डाकरे यांनी मोका चौकशी करुन शवविच्छेदना करिता ब्रहम्हपुरी ला शव पाठविले असून पुढील तपास सुरू आहे