आ.सुधीर मुनगंटीवार यांचा उपक्रम.
Bhairav Diwase. Aug 11, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन व दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने आज (११ऑगस्ट) मंगळवार ला स्वयंचलित सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.या मशीन चे लोकार्पण महापौर राखीताई कंचर्लवार यांचे हस्ते करण्यात आले.तसेच आर्सेनिक अलब्म 30 या औषधीचे वितरण करण्यात आले.
चंद्रपूर महानगर भारतीय जनता पार्टी चंद्रपुरच्या वतीने आयोजित या लोकार्पण सोहळ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष (महानगर)डॉ मंगेश गुलवाडे,भाजयुमो महानगर जिल्हाअध्यक्ष विशाल निंबाळकर,भाजपा नेते प्रकाश धारणे,भाजपा नेते दत्तप्रसन्न महादाणी ,उपमहापौर राहुल पावडे,पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, भाजपा कार्यकर्ते रामकुमार आकापेलिवार, पवन ढवळे,रामणारायन रविदास यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी महापौर राखीताई कंचर्लवार म्हणाल्या,पोलीस सुरक्षित तर समाज सुरक्षित.पोलीस,हा लढा प्रत्यक्ष समोर येऊन कोरोनाशी लढा देत आहे.अनेक पोलिसबंधु संक्रमित झाले,त्यामुळे पोलीस व त्यांचा परिवार सुरक्षित रहावा म्हणून प्रारंभी सॅनिटायझर, मास्क,आरोग्य तपासणीचे उपक्रम आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावतीने राबविण्यात आले.आता विषयाचे गांभीर्य ओळखून आ.मुनगंटीवार यांनी स्वयंचलीत सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिली,त्याचे रितसर लोकार्पण झाले अशी घोषणा त्यांनी केली.
या प्रसंगी डॉ मंगेश गुलवाडे यांनी, अश्या स्वयंचलित सॅनिटायझर मशीन महानगरातील सर्व पोलीस स्टेशन ला लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले.