Top News

युरियाचा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्रावर व सोसायटी वर कारवाई करा.

शेतकऱ्यांना युरिया वेळेवर पोचवा अन्यथा आंदोलन श्री नारायण हिवरकर भाजपाध्यक्ष कोरपना तालुका यांची मागणी.

Bhairav Diwase. Aug 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:-
कोरपना तालुका आदिवासी दलित शोषित पीडित म्हणून ओळखला जातो येथे बहुतांश शेतकरी वर्ग असून शेतीला लागलेला युरिया खताचा तुटवडा दाखवून शेतकरी वर्गाला नागवल्या जात आहे कृषी केंद्र मालकांना युरियाची मागणी केली असता पहिलेच नाही म्हणून सांगतात व नंतर लिंक पद्धत सांगतात आमच्याकडे बी बियाणे व कीटकनाशके तुम्ही घेत नाही म्हणून शेतकऱ्यांना सांगतात आमच्याकडील ग्राहकांना आम्ही देतो आम्हाला युरिया कमी येतो अशा अनेक गोष्टी सांगून अखेर युरीया संपला म्हणून सांगतात मार्केटला युरिया येत असतो.

परंतु कृषी केंद्र धारक व जय किसान सोसायटीचे बाबू तुमच्या ने जे होते ते करून घ्या माल नाही म्हणून सांगतात शंभर बॅगा आल्या दोनशे बॅगा आल्या कोणा कोणाला देणार बारा भानगडी सांगून वापस करतात तरी योग्य चौकशी करून जयकिसान सोसायटीचे बाबु श्री बोटरे साहेब माझे कोनी काही करु शकत नाही म्हणून शेतकऱ्यांना धमकावतात तसेच बोटरे बाबुची योग्य चौकशी करुण कारवाही करण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तसेच भाजपा पदाधिकारी श्री अमोल आसेकर,श्री कवडूजी जरिले,श्री पुरुषोत्तम भोंगळेे,श्री वसीम शेख,श्री किशोर मालेकर,श्री रामदास कौरासे तसेच परिसरातील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे योग्य ती चौकशी करून युरिया उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने