Top News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या क्षेत्रातील सात गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला.



चारगाव नदीला पूर, सावली मुख्यालयाशी संपर्क तुटला.
Bhairav Diwase. Aug 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- चारगाव नदीला पूर आल्याने तालुक्यातील ७ गावांचा सावली मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. छटाकभर पाऊस आला तरी, मागील अनेक वर्षापासून असाच संपर्क तुटत असतानाही मागील सहा वर्षापासून तेव्हा आमदार आणि आता पालकमंत्री असलेले विजय वडेट्टीवार हे या क्षेत्रातील जनतेला न्याय देऊ शकत नसल्याची भावना नागरिकात निर्माण झाली आहे.

सावली तालुक्यातील चारगाव हे गाव मुख्यालयापासून ३ किलोमीटर आहे. आणि या मार्गावर नदी आहे. आसोला मेंढा तलावाच्या ओव्हर फ्लोचे पाणी येते. या नदीवरील पूलाऐवजी रपटा केल्याने पावसाळ्यात दरवर्षी या नदीला पूर येत असते. पूर आल्यानंतर या पुलावरून २-३ दिवस पाणी उतरत नाही व तालुक्यातील चारगाव, भारपायली, मानकापूर, चक, मेटेगाव, सादागड व हेटी या ७ गावांचा सावली मुख्यालयाशी संपर्क तूटतो.

शोभाताई फडणवीस आमदार असताना या पुलाचे चुकीचे बांधकाम करण्यात आले होते. हे पूल लहान असल्याने सतत पूर असते. व या गावातील लोकांना आपल्या सावली येथे दवाखान्यात, बाजारात, किराणा दुकानात जावे लागते. पण पूर आल्यानंतर दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही. या गावांना पर्यायी मार्ग आहेत. पण त्या मार्गांवर सुद्धा नाले आहेत. आणि त्यांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि पुलावरून अनेक वाईट घटना घडलेल्या आहेत. ७ वर्षाआधी चारगाव येथील एकाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी गाडी वाहून गेली होती.

विजय वडेट्टीवार यांनी २०१४ मध्ये या नदीवर नवीन पुल बांधण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या पाच वर्ष्यात अजिबात लक्ष दिले नाही आता तर मंत्री झाले आहेत. पण आश्वासन तेच.

मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे या पदाचा वापर करून या पुलाचा प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा होती मात्र बगीचे, आणि रेस्ट हाऊस बांधकामाकडेच त्यांचे लक्ष असल्याने सात गावांचे भोग कायम आहे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे यातील सर्व गावे पूर्णता आदिवासी बहुल आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने