आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा दिला विश्वास.
Bhairav Diwase. Aug 11, 2020
नागभीड:- नागभीड तालुक्यातील कसर्ला येथील अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याने त्या मुलीने आपले जीवन संपविले आत्महत्या करण्याआधी त्या मुलीने चिट्ठी मधे आरोपींचे नाव लिहून ठेवले होते त्या आधारे पोलीसांनी त्या आरोपींना अटक केलेली आहे.
सदर मुलीची आत्महत्या चे दुःख चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी व्यक्त केले ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहून प्रत्येक परिस्थिती या कुटुंबाला सहकार्य करण्याचा विश्वास आमदार बंटीभाऊ यांनी दिला.
या वेळी भाजपा जेष्ठ नेते श्री वसंत भाऊ वारजूकर,भाजपा तालुका अध्यक्ष संतोषभाऊ रडके,व पदाधिकारी उपस्थित होते.