आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, सुरु होणार व्यायमशाळा.

Bhairav Diwase
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा.
Bhairav Diwase. Aug 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- लॉकडाउन काळापासून व्यायमशाळा बंद असल्याने व्यायमशाळा मालक व येथे काम करणा-या कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. त्यामूळे व्यायमशाळा सुरु करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. तसेच सातत्याने त्यांच्याकडून सदर मागणीचा पाठपूरावाही सुरु होता. दरम्याण आज आ. जोरगेवार यांनी उपमूख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली असून व्यायमशाळा सुरु करण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. परिणामी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पर्यत्नांना यश आले असून आता लवकरच व्यायमशाळा सुरु होणार आहेत.