Bhairav Diwase. Aug 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
नागभीड:- तालुक्यातील कसरला येथील एका 16 वर्षीय मुलीवर गावातीलच दोन युवकांनी बलात्कार केल्याने, या मुलीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृतक मुलीचे नाव प्रांजू राजेंद्र वाघमारे (वय १६) असे असून ती नुकतीच दहावीत 61 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती.
मृतक मुलगी काल काल आपल्या शेतात शेती कामासाठी गेली होती. तिथे तिच्यावर अजय ननावरे व मंगेश मगरे यांनी बलात्कार केला. यानंतर या मुलीने सायंकाळी चार वाजता चे दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
मृतक मुलीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून शेतीच्या गाडीवर ठेवली व त्यावर पावडा ठेवला. त्यात, तिने अजय नन्नावरे आणि मंगेश मगरे यांनी बलात्कार केल्याचे नमूद केले आहे.
प्रांजू वाघमारे हिची आई रोवनीच्या कामासाठी दुसऱ्याचे शेतावर गेली. होती ती परत आल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही म्हणून काही करून नागरिकांना सोबत घेऊन, शेताचे परिसरात शोधाशोध केली. त्यावेळी फावळ्याचे खाली एक चिठ्ठी आढळली त्यात, अजय नन्नावरे व मंगेश मगरे यांनी माझे वर रेप केला असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असे स्पष्ट नमूद केले.
अंधार पडल्याने मुलीचा शोध घेता आला नाही मात्र तिने आपल्या जीवाचे बरे वाईट केल्याचा अंदाज आल्याने पोलिसांना ही माहिती मृताच्या नातेवाइकांनी दिली.
आज गावकऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर मुलीचे प्रेत कुषाबराव बारेकर यांचे शेतातील विहिरीत आढळून आले. या घटनेची माहिती मृतक मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली असून पोलिसांनी तिचे विहिरीतून काढले आणि उत्तरीय तपासणीसाठी नागभीडला नेले.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत