०५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख.....
समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही, तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.
शिक्षक आपल्या जीवनातील अज्ञान दूर करून व्यवहारातील अनेक विषयांचे ज्ञान देतात. आपल्या जीवनाचे योग्य दिशादर्शक म्हणजे शिक्षक होय. आपण त्यांचा प्रतिदिन आदरच करायला हवा. आजचा दिवस हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच दिवस आहे.
प्रत्येकाच्या मनात आपल्या शिक्षकाप्रती अत्यंत आदराची भावना असते. पण, शिक्षक आता केवळ मार्गदर्शक राहिलेला नाही. काळानुसार हे नातं खूपसं बदललंय. आजचे बरेचसे शिक्षक अभ्यासाव्यतिरिक्तही अनेक गोष्टीत मुलांच्या सोबत असतात. त्यांच्यासोबत ते व्हॉटसअॅपवर, फेसबुक, व्हिडिओ व कॉलिंग वर कनेक्ट असतात. फेस्टिव्हलच्या तयारीत उतरतात. हे असं मित्रत्वाचं नातंच जपायला शिकवतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांना आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात असतात.
जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते तो गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजे. आणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.
आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात. आपल्याला गुरु चे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले तर आपल जिवन सुखमय होते.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांना खूप महत्व असते. तसेच त्यांना महत्वाचे स्थान दिले जाते. शिक्षकांना एका देवापेक्षा सर्वात उच्च स्थान दिले जाते. कारण शिक्षक तेच असतात जे मुलांमध्ये विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती विकसित करतात.
आई – वडील हे आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात पण त्यानंतर एक शिक्षक हि मुलांना पूर्ण रूपाने घडवण्याचे काम करतात. शिक्षक प्रत्येक मुलाला त्यांचे जीवनाविषयक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात.
एक शिक्षका शिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही आणि आपल्या जीवनात यश मिळवू शकत नाही. असे काही शिक्षक आहेत जे मुलांच्या जीवनासाठी आणि प्रेरणा बनतात.
सप्टेंबर महिना व शिक्षक दिन यांचे अतूट नाते आहे. विद्यार्थी, पालक, समाज या दिवशी शिक्षकांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करतात. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करतात. क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उपजत असतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास होतो.
*डॉ. राधाकृष्णन म्हणतात.*
*(The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other's.)*
*('शिक्षणाचे महत्त्व केवळ ज्ञान आणि कौशल्यच नाही तर इतरांच्या सहवास जगण्यास मदत करणे होय.)*
आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते. त्यांनी, शिक्षकत्वाच्या आदर्शाचा राजपथ तयार केला आहे. प्रत्येक शिक्षकान खर्या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ आणि उद्यमशील भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे.
आपण जीवनातील अयोग्य गोष्टी टाळाव्यात, आदर्श वागावे, यासाठी शिक्षक आपल्याला आईप्रमाणे शिक्षा करतात. त्यामागे आपण आदर्श व्हावे, हाच शुद्ध हेतू असतो. त्यांनी शिक्षा केल्यावर आपल्याला अज्ञानामुळे राग येतो; पण आपण त्यांच्या कृतीमागील हेतू समजून घ्यायला हवा. जसा कुंभार मडके घडवण्यासाठी कच्च्या मडक्याला थापटी मारतो, त्याप्रमाणे ते आपल्याला शिक्षा करतात. ‘मुलांच्या जीवनाला योग्य आकार यावा, त्यांचे जीवन समाजासाठी आदर्शवत आणि आनंददायी व्हावे’, असे शिक्षकांना वाटत असते.
(जि. प. उच्च प्राथ शाळा चेक आष्टा) 1st to 7th class
(श्री. साईकृपा विद्यालय चिंतलधाबा) 9th to 10th class
(चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा) B. Com 1st to 3rd year class
(चिंतामणी कॉलेज ऑफ साॅयन्स पोंभुर्णा)
माझे शिक्षक मला फक्त पुढे जाण्यातच प्रेरणा देत नाहीत तर माझ्यामध्ये सकारात्मक भावना देखील जागृत करतात. आज त्यांच्यामुळेच मी एक आदर्शवादी बनू शकलो. म्हणून माझे शिक्षक मला खूप – खूप आवडतात.
आज मि जे आहे ते माझ्या शिक्षकांमुळेच. त्यांच्या मार्गदर्शनामुळे. शिक्षक माझ्या जीवनातील एक आधार स्तंभ आहेत.
सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 👩🏫👩🏫👩🏫
भैरव धनराज दिवसे