Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जमिनीचा वाद गेला विकोपाला #chandrapur #Saoli #murder


लहान भावाने केली मोठ्या भावासह वहिनीची हत्या
सावली:- जागेच्या वादावरून झालेल्या भांडणाचे पर्यास खुन करण्यापर्यंत गेल्याची घटना सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे घडली. मनोहर निंबाजी गुरुनुले वय 62 वर्षे व शारदा मनोहर गुरुनुले वय 50 वर्षे असे खुन झालेल्या नवरा बायकोचे नांव आहे. तर धनराज निबांजी गुरुनुले वय 52 वर्षे याने आपल्या संख्या मोठ्या भाऊ व वहिनाच खुन केला आहे. सदर घटनेमुळे तालुक्यात खळबळ मोजली असुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीवरून सावली तालुक्यातील मायडोगरी येथील मनोहर निंबाजी गुरुनुले वय 62 वर्ष, सौ. शारदा मनोहर गुरुनुले वय 50 यांचा मागील काही दिवसापासुन जागेच्या वादात लहान भाऊ धनराज निंबाजी गुरुनुले वय 52 वर्ष यांच्या सोबत वाद होत होता. यातुन नेहमी छोटे मोठे वाद होत होते, मात्र आज 5 सप्टेंबर रोजी दोघा भावांमध्ये चांगलेच भांडण झाले. यातच लहान भाऊ धनराज गुरुनुले यांने सखा मोठा भाऊ मनोहर गुरुनुले व वहीणी शारदा गुरुनुले यांना सब्बलीने मारहाण केली. सदर मारहाणीत मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाला तर शारदा गुरुले गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला.
सदर घटनास्थळावर पाथरीचे पोलीस निरीक्षक मंगेश मोहड यांनी आपल्या पथकासह जावुन पंचनामा केला व आरोपी धनराज गुरुनुले यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कलम 302 , 307 हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे. घटनास्थळीला उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे यांनी भेट दिली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत