Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त टेनिस बॉल क्रिकेट चे नामवंत खेळाडू सुरज परसुटकर यांचा सत्कार #chandrapur

चंद्रपूर:- दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर च्या वतीने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त "राष्ट्रीय क्रीडा दिन" यांचे औचित्य साधून पत्रकार भवन चंद्रपूर येथे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी चंद्रपूर चे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तर उद्घाटक म्हणून चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार लाभले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पप्पु देशमुख माजी नगर सेवक चंद्रपूर मनपा, माजी क्रीडा अधिकारी मुश्ताक सर, प्रदीप अडकीने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू साठी सुरज बंडुजी परसुटकर आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा शिक्षक, बजाज विद्या भवन, चंद्रपूर यांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुरज परसुटकर यांनी आपल्या सत्काराचे श्रेय ड्रीम चंद्रपूर चे अध्यक्ष प्रेम गावंडे चंद्रपूर जिल्हा, सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिस ए. खान सर, माझे मार्गदर्शक व सचिव प्रा. विक्की तु. पेटकर सर तसेच सर्वोदय महिला मंडळाचे अध्यक्ष मा. नीलजी बजाज मॅडम, सी.ई.ओ. भरतजी बजाज सर, संचालिका. ममताजी बजाज मॅडम, बजाज विद्या भवन च्या प्राचार्या. सिंधु राव मॅडम यांना दिले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत