Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कर्जापाई शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या #suicide


काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रविभाऊ मरपलीवार यांनी जीव धोक्यात घालून विहिरीत घेतली उडी

पोंभुर्णा:- कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात थांबता थांबेना, दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या चे प्रकरण डोळ्यासमोर येत आहे.
कर्जाचा बोजा व अतिवृष्टीमुळे झालेली पिकाची नुकसान या विवंचनेत असणाऱ्या घोसरी येथील शेतकऱ्याने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. मारोती विश्वनाथ नाहगमकर वय 62 वर्ष असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
उडी घेत असताना काही लोकांनी बघितल्यानंतर काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच रविभाऊ मरपलीवार यांना घटनेची माहिती दिली. रविभाऊ मरपल्लीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत पुढे घेऊन त्या शेतकऱ्याला वाचवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. बाहेर काढण्यासाठी टाकलेला पाईप मध्यंतरी तुटून खाली पडल्यामुळे दोघेही पुन्हा खोल पाण्यात पडले आणि बुडाले. दुर्घटनेत मारुती नागामकर यांचा शेवटी मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी जाणारे रवी भाऊ मरपल्लीवार हे ही जखमी झाले असून ते विहिरीबाहेर सुखरूप निघाले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून एकासाठी दुसराही जीव धोक्यात टाकून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यांना यात अपयश आले.
मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. ते मुळ लागूनच असलेल्या नांदगाव येथील रहिवासी आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी पंचशील नगर घोसरी येथे राहायला आले होते.
घटनास्थळी मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात बेंबाळ पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी पंचनामा करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत