डाॅ. जि.एस. लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा संपुर्ण संच लंपी रोगावर लसीकरण शिबिर राबवतांना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपी ने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे . ऐन कामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे. लंपी हा रोग संसर्गजन्य असल्याने एकापासून अनेक जनावरांना होत आहे.
याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये करीता जिल्ह्यातील जनावरांवरील वाढत असलेल्या लंपी रोगावर मात करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण शिबिर राबवत आहे.
तसेच ग्रामपंचायत चेक बल्लारपूर येथील लंपी रोगावर लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आला आहे. जनावरांना लंपी रोगावर लसिकरन देण्यात आले. डाॅ. जि.एस. लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा संपुर्ण संच शिबिर राबवत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत