चंद्रपूर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित 3446.
Bhairav Diwase. Sep 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने आता पाय पसरायला सुरूवात केली असून आकडा तीन हजारांच्या पार गेला आहे. शासकीय कार्यालये आणि कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला. चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात तब्बल 180 कैद्यांना कोरोना झालाय. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. त्यामुळं कारागृह प्रशासन हादरले आहे. कैद्यांसोबतच कर्मचारीही बाधीत झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत कैदी बाधीत झाल्याने त्यांना एका खासगी आयटीआय इमारतीत हलवण्यात आले असून, तिथं त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.