Bhairav Diwase. Sep 01, 2020
कोरपना:- माणिगढ सिमेंट कंपनी मधील चेअरमन बंगला येथील चोरी झालेबाबत तक्रारदार सिक्युरिटी इन्चार्ज पुरूषोत्तम मारूती घसाड यांनी दिलेल्या तकारी वरून दि . 26/08/2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हयात चेअरमन बंगल्यातील 02 नग आलीशान सोफा सेट , 11 अलिशान डायनिंग खुर्त्या 02 सेंट्रल टेबल , 01 सिंगल बेड , 11 जुने वापरते सिलिग फॅन . 07 बॉल लाईट व इतर असा एकूण असा एकुण 1,76,400 / - रू . चा माल कोणतरी अज्ञात इसमांनी घरफोडी करून चोरी केला होता . सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने लागलीच मा . उप विभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोनि भारती यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे गुन्हा नोंद होताच पोउपनि युवराज पाटील यांचे नेतृत्त्वात सफौ . सुनिल बोरीकर , पोशि विश्वनाथ चुदरी यांचे व पोहवा सुनिल मेश्राम पोशि इंदल राठोड , पोशि धिरज गोवर्धन अशी दोन पथके तयार करण्यात आली व तपासाचे चक्र गतीने फिरविले असता गोपनिय माहीतगार यांचे मार्फत माहीती प्राप्त करून प्रथम आरोपी नामे
1 ) अन्वर शेख शब्बीर अन्सारी वय 25 रा . वॉर्ड नं . 04 गडचांदूर ता . कोरपना जि . चंद्रपूर यास ताब्यात घेवून कौशल्य पूर्वक चौकशी केली असता आरोपीने गुन्हयाची कबूली देवून इतर दोन साथीदार
2 ) किशोर प्रमोद ठाकूर वय 30 वर्ष रा . वॉर्ड नं . 04 गडचांदूर ता . कोरपना जि . चंद्रपूर व
3 ) रायभान भारत साहू वय 30 वर्ष रा , वॉर्ड नं . 04 गडचांदूर ता . कोरपना जि . चंद्रपूर यांनी मिळून चोरी केल्याचे सांगितले त्या नुसार इतर दोन आरोपींना शिताफिने अटक करून चोरीस गेलेला खालील काही मुददेमाल आरोपींचे घरातून तर उर्वरीत मुददेमाल चोरीचा माल विकत घेणारे दोन इसमाकडून हस्तगत करण्यात आला व सदर चोरीचा माल घेणाऱ्या दोन इसमांना गुन्हयात कलम 411 भादवि अन्वये अटक करून सर्व साहित्य हस्तगत करण्यात आला .
1 ) किं . अं . 1.00000 / - रू .02 नग जुने वापरते सोफा सेट
2 ) कि . अं . 33,000 / - रू . 11 नग जुन्या वापरत्या डायनिंग खुर्ध्या
3 ) कि . अं . 10,000 / - रू . 02 नग जुने वापरते सेंट्रल टेयल
4 ) कि , अं . 15,000 / - रू . 01 नग जुने वापरते सिंगल बेड
5 ) कि . अ . 11,000 / - रू . 11 नग जुने वापरते सिंलिंग फॅन
6 ) किं . अं . 200 / - रू . 02 नग जुने वापरते टयुब लाईट
7 ) किं . अं . 500 / - रू .01 नग जुने वापरते वॉल मॉउटींग फॅन
8 ) किं . अं . 4,000 / - रू . 08 नग बाथरूमचे . टॉयलेटचे मोठे स्टिलचे नळ प्रत्येकी 500 रू प्रमाणे
9 ) किं . अं .6,800 / - रू . 34 नग बाथरूमचे , टॉयलेटचे छोटे स्टिलचे नळ प्रत्येकी 200 रू प्रमाणे असा एकुण 1,80,500 / - रू . चा माल हस्तगत करण्यात आला . सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक डॉ . महेश्वर रेड्डी सा . अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे सा ... मा . उप विभागीय पोलीस अधिकारी यामावार सा . यांचे मार्गदर्शनात पोनि गोपाल भारती तपास अधिकारी पोउपनि युवराज पाटील , सफौ . सुनिल बोरीकर , पोहवा सुनिल मेश्राम पोशि मीविश्वनाथ चुदरी पोशि इंदल राठोड . पोशि धिरज गोवर्धन यांचे पथकाने पार पडली यात माणिकगड कंपनी ची कडक सेक्रुटी असताना सुद्धा एवढ्या मोठ्या वस्तू कंपनी च्या बाहेर गेल्याच कश्या हा संशोधनाचा विषय आहे.