Bhairav Diwase. Sep 01, 2020
मुल:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका व्यवस्थापन कक्ष, मूल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत उपजीविका बिगर शेती समावेश सुक्ष्म व लघु उद्योग मार्फत विविध प्रकारच्या आर्थिक व तांत्रिक सेवा सुविधा पुरविण्याकरिता one stop facility center म्हणजेच OSF केंद्राचे उद्घाटन मा. चंदूभाऊ मारगोनवार, सभापती, पं. स.मूल यांचे शुभ हस्ते तसेच मा. घनश्याम जुमनाके,उपसभापती, पं. स.मूल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. OSF चे मुख्य उद्देश म्हणजे नवीन उद्योगांसाठी व्यवसाय संकल्पना आणि विद्यमान उद्योगांना वाढीचे मार्गदर्शन करणे, व्यवसाय सुरू करून वाढविण्यास चालना देणे, व्यवसाय आराखडा बनवणे, उद्योग स्थापन करून चालविणे व बाजार पेठेशी जोळणी करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. सदर उद्घाटन प्रसंगी श्री. राजू परसावार, सहा. गट विकास अधिकारी , पं.स. मूल तथा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष , मूल अंतर्गत कु. माया सुमटकर, ता.अ. व्य, कु. जयश्री कामडी, ता.स., श्री. वसीम काझी,प्रशा तथा सहा. लेखापाल, श्री. जीवनकर, श्री. तुराणकर, ता.व्य. श्री. बोरकर, श्री. रंगारी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.